Satara

esahas.com

विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिर

विजय दिवस समारोह निमित्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विजय दिवस समारोह समिती, कराड व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने गुरूवार दि. १६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

esahas.com

नावली येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

सातारा वन विभागाचे बिबट्यापासून संरक्षण करावयाच्या उपाययोजना कागदावरच रहात असल्याचे स्पष्ट होत आहे. ठोसेघरमध्ये वनविभागाची प्रबोधन मोहिम सुरू असताना नावली येथे बिबट्याने मानवी वस्तीत घुसून पांडुरंग शिंदे यांची कालवड ठार केली. या हल्ल्यामुळे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांचा फोलपणा समोर आला आहे.

esahas.com

स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत नागनाथवाडी प्रथम

स्मार्ट व्हिलेज' स्पर्धेत खटाव तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवत नागनाथवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट व्हिलेज योजना आहे. नागनाथवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचा सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

esahas.com

जिल्ह्यात चौतीस लाख नागरिकांनी घेतली लस

कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 34 लाख 68 हजार 898 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

esahas.com

उसाच्या फडाला लागलेल्या आगीत बालिकेचा भाजून मृत्यू

बनवडी येथील ऊस तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊस तोड मजुरांची टोळी गावात आली आहे. मंगळवारी ऊस तोड मजूर गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना 11 महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊस तोडणी सुरू असताना नंदिनीला झोळीत झोपवून ती फडात गेली.

esahas.com

मलकापूरात युवकावर चार-पाच जणांकडून धारदार शस्त्राने वार

मलकापूर, ता. कराड येथील मलकापूर फाट्यावर भरदिवसा युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार केला. बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

esahas.com

कराडात मुंगसाच्या केसांपासून बनवलेले पेंटींग ब्रश जप्त

बुधवार दि. १५ रोजी वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड आणि मलकापूर येथे एकाचवेळी ५ रंग व्यवसायिक दुकानदारांवर छापा टाकला. यामध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाचही दुकानातून वनविभागाने 1 हजार 735 ब्रश जप्त केले आहेत.

esahas.com

एकाची आत्महत्या

वाई येथील मानेनगर, सोनगिरवाडी येथील शकील खुदबूद्दीन बागवान (वय ५0) यांनी सोमवार, दि. १३ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

esahas.com

युवकाचा ट्रॅकटर पलटी झाल्याने मृत्यू

वाई तालुक्यातील बावधन येथील दिनेश चंद्रकांत नायकवडी (वय ३६) या युवकाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

esahas.com

एकाची आत्महत्या

सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे येथील अशोक विष्णू भोसले (वय ६0) या वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार, दि. १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.