maharashtra

विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिर

बांगलामुक्ती संग्रामातील विजयाप्रीत्यर्थ आयोजन : राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून रक्तदान करण्याचे आवाहन

Blood donation camp today on behalf of Victory Day Celebration Committee
विजय दिवस समारोह निमित्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विजय दिवस समारोह समिती, कराड व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने गुरूवार दि. १६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कराड : येथील विजय दिवस समारोह निमित्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विजय दिवस समारोह समिती, कराड व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने गुरूवार दि. १६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय सैन्यदलाने बांगलामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ या विजयाचे साक्षीदार असलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातून येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने सैन्यदलाच्या सहकार्याने दि. 13 ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. परंतु, या समारोहाच्या मुख्य दिवशी दि. १६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील व तहसिलदार विजय पवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कराड नगरपालिकेचे अभियंता अशोक पवार, विनायक विभूते, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव व अॅड. संभाजी मोहीते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, श्रीरल हॉस्पीटल समोर, शनिवार पेठ, कराड येथे दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी रमेश पवार 9049843131, विवेक चव्हाण 9881823537 व विलासराव जाधव 9860298687 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.