Satara

esahas.com

भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी करुनही जिल्हाधिकारी सर्वोत्कृष्ट कसे ?

राज्य सरकारने कोरोना काळात चांगले काम केले म्हणून राज्यातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये सातारचे जिल्हाधिकारी यांना देखील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर केलेला आहे. मात्र, मी राज्य शासन व आयुक्तांकडे कोरोना काळात प्रशासनात झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप पुराव्यानिशी करुन देखील त्यांना हा पुरस्कार कसा जाहीर झाला आहे असा माझा सवाल असून राज्य शासनाने हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.

esahas.com

अजिंक्यताऱ्यावर सलग दुसऱ्या दिवशी वणवा

सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.

esahas.com

महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे

महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.

esahas.com

जिल्हा ओबीसी संघटनेचे सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आज सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना निवेदन पाठवले.

esahas.com

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष गौरव पुरस्काराचे 9 रोजी साताऱ्यात वितरण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.

esahas.com

जागतिक स्तरावर जवळपास २.४ अब्ज महिलांना पुरुषांसारखे आर्थिक अधिकार नाहीत

८ मार्च हा जागतिक महिला दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. तत्पुर्वी जागतिक बँकेने १ मार्च ला 'महिला, व्यवसाय आणि कायदा २०२२' चा अहवाल जाहिर केला आहे, या अहवाल नुसार जगातील सुमारे २.४अब्ज महिलांना समान आर्थिक संधी म्हणजे पुरुषांसारखे आर्थिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. यामध्ये जगातील १७८ देशांनी या बाबतचे कायदेशीर अडथळे कायम ठेवले आहेत. त्यामुळे महिलांचा संपूर्ण आर्थिक अधिकार रोखले जात आहेत.

esahas.com

भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार

सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

esahas.com

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाण्याचे फायदे, वजन कमी करण्यापासून ते बऱ्याच गोष्टींसाठी उपयुक्त

गूळ खाल्ल्याने तुमचे वजन तर नियंत्रणात राहतेच शिवाय अनेक प्रकारच्या आजारांपासूनही सुटका मिळते.

esahas.com

बिग बींच्या घरातील 'या' पेंटिंगमध्ये दडलंय वास्तुशास्त्रातील मोठं रहस्य

बिग बींचा थाटंच न्यारा, 'त्या' पेंटिंगची किंमत थक्क करणारी

esahas.com

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.