महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.
वाई : महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.
दि ८ मार्च २०२२ रोजी महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचावा, याकरिता महिला दिनाचे औचित्य साधून त्यादिवशी वाई पोलीस ठाण्याचा संपुर्ण कारभार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फतीने चालवावा, अशी वरिष्ठांचे आदेशान्वये संकल्पना सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे महिला अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.


