maharashtra

अजिंक्यताऱ्यावर सलग दुसऱ्या दिवशी वणवा

गेल्या दोन महिन्यातील सातवी घटना; समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी

For the second day in a row on Ajinkyatara
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.

सातारा : सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.
रविवारी दुपारी अज्ञात इसमांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर वणवा लावल्यामुळे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले होते. काल किल्ल्याच्या दक्षिण भागात किल्ल्यावर लागलेला वणवा आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू असताना आज सायंकाळी किल्ल्याच्या उत्तरेला अज्ञात समाजकंटकांनी वणवा लावला. हा वणवा इतका प्रखर होता की, आगीच्या ज्वाळांनी रुद्र रूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच सातारा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली,  आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना त्यात यश आले नाही. समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक गेल्या दोन महिन्यांपासून वनवे लावण्याचा प्रयत्न होत आहे. दोन महिन्यातील आज वणवा लावण्याची सातवी घटना असून नागरिकांनी वणवे लावू नये असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.