maharashtra

जिल्हा ओबीसी संघटनेचे सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन


District OBC Association's Bombabomb Movement at Satara
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आज सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना निवेदन पाठवले.

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आज सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना निवेदन पाठवले.
याबाबत निवेदनात म्हटले आहे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण स्थगित झाली आहे. यापूर्वी १०५ नगरपंचायत व अकोला, वाशिम, भंडारा, पालघर, नंदुरबार, नागपूर या जिल्हा परिषदेमधील पोटनिवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यामुळे या प्रवर्गावर अन्याय झाला आहे. घटनेच्या ७३  व ७४ व्या घटना दुरुस्तीने आरक्षण मिळाले होते तरीही न्यायालयात योग्य मांडणी केंद्र व राज्य सरकारकडुन झाली नाही त्यामुळे या पुढील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत. बारा बलुतेदार समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे, एसबीसी समाजाचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत बसवावे, महाज्योती या संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात भरत लोकरे, विजय सपकाळ, सुरेश पवार, सुनिता दीक्षित, भाऊ दळवी, बापूराव काशीद, श्रीकांत आंबेकर, संजय परदेशी, संतोष साळुंखे, प्रमोद क्षीरसागर, संजय पोतदार, अजय काशीद, अक्षय चव्हाण, योगेश साळुंखे आदींनी सहभाग घेतला.