अवैध शस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांबाबतीत अटकेत असलेल्या आरोपीकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 65 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.
शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याची मोटर चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाण्याची मोटरही हस्तगत करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जिल्हयातील सुमारे ५५० गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आणि त्यांच्या मागण्यांची काळजी घेणारे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कर्मचाऱ्यांनी घंटानाद व घोषणाबाजी केल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये 500 पेक्षा अधिक वकील सहभागी झाले होते. ही रॅली सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारापासून ते राजवाडा तेथून पुन्हा कर्मवीर पथ मार्गे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या 15 वार्डसह बाह्य रुग्ण विभागाचा आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना काय सुविधा मिळतात, याची त्यांनी माहिती घेतली. राऊंड नंतर झालेल्या आढावा बैठकीतही प्रशासकीय कामकाजाच्या त्यांनी सविस्तर सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या.
सातारा शहरातील सुप्रसिद्ध येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने दिवाळीनिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा शहरातील पंताचा गोट व पाटखळ ता. सातारा येथील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
रात्रगस्तीसाठी असलेल्या पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचार्याना दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.