maharashtra

हॉटेल मालकाची सुमारे 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


हॉटेल मालकाची सुमारे 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : हॉटेल मालकाची सुमारे 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 1 ऑगस्ट 2022 ते 28 मार्च 2023 दरम्यान राहुल आत्माराम भोसले राहणार देवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे याने प्रतिक प्रवीण जगताप राहणार केंद्र तालुका वाई यांना तो निखिल फिल्म चा प्रोडूसर असल्याचे सांगून त्यांच्याकडे काम करणारे कलाकार व कामगार यांच्यासाठी जगताप यांच्या राजगड कृषी एक्झिक्युटिव्ह लॉजिंग मधील रूम भाड्याने घेऊन तसेच तेथेच संबंधितांची जेवणाची व्यवस्था करण्यास सांगून लॉजिंगच्या भाड्याची रक्कम व जेवणाचे बिल असे एकूण 23 लाख 18 हजार 988 रुपयांची फसवणूक केली आहे तसेच तालुका वाई येथील जगताप यांच्यात हॉटेल रूची पार्क येथे पूजेला हमीदुल्ला पटवेकर राहणार मोमीन मोहल्ला इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी मी निखिल फिल्मचा फायनान्स कन्सल्टंट व सहकारी म्हणून काम करीत असून रूची पार्क येथे या फिल्ममध्ये काम करणाऱ्या सहकार यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगून त्या जेवणाचे बिल न देता सतरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे अशा पद्धतीने भोसले आणि पटवेकर यांनी जगताप यांची 40 लाख 18 हजार 988 रुपयांची फसवणूक केल्या बाबतची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे करीत आहेत.