maharashtra

अटकेतील आरोपीकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत


अवैध शस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांबाबतीत अटकेत असलेल्या आरोपीकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 65 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.

सातारा : अवैध शस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांबाबतीत अटकेत असलेल्या आरोपीकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 65 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवैध शस्त्र प्रकरणी अटकेत असलेल्या अविनाश पिसाळ यांच्याकडे वाई पोलिसांनी अधिक तपास करून त्याला विश्वासात घेऊन त्याच्या बावधन येथील जनावरांच्या गोठ्यात लपवून ठेवलेले आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस त्याच्याकडून हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पोलीस हवालदार राहुल भोईर व अजित जाधव,पोलीस अंमलदार हेमंत शिंदे,श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के, नितीन कदम, गोरखनाथ दाभाडे या तपास पथकाने ही कामगिरी केली. या टीमचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले.
यापूर्वी या आरोपीकडून तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे,
 वाघाचे नख असा सहा लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.