Satara

esahas.com

Aadhaar: आधारवरील नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकता?

Aadhaar Card : सध्या आधार हा अत्यंत महत्वाचा दस्तवेज झाला आहे.

esahas.com

पांढरवाडी गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा

पांढरवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत पोल्ट्रीच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ४ चारचाकी वाहने, ७ दुचाकी, ११ मोबाइल्स, तलवारी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९८ हजार ६९० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत २० जणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

esahas.com

१ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला १ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला असून चांगली कामगिरी केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज कौतुकाची थाप टाकली.

esahas.com

नेले येथे उसासह ज्वारीच्या पिकाला अज्ञातांकडून आग

नेले, ता.सातारा येथे अज्ञातांकडून दोन एकर खोडवा उसासह ज्वारीच्या कडब्याची गंज जाळण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर संबंधितांवर कडक कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

esahas.com

बेबलेवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी

बेबलेवाडी, ता. सातारा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतला. यामध्ये दोन वृद्ध दापत्य गंभीर जखमी झाले आहे. तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे.

esahas.com

वाढेफाटा येथे पिकअप टेम्पोत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

घराशेजारी उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोमध्ये एका ७५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. मधुकर बाबुराव पवार रा. शारदादीप ऑटोमोबाइलजवळ, वाढेफाटा, खेड, सातारा असे या मृत वृद्धाचे नाव आहे.

esahas.com

बेशिस्त वाहतुक प्रकरणी ६५ लाखाचा दंड वसूल

जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये ५५८ जणांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर तब्बल ६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा येथे सुमारे ५५ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत

येथील बुधवार नाका ते बाबर कॉलनी करंजे परिसरामध्ये दुचाकीवरून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करणाऱ्या तानाजी कृष्णा किर्दत, वय ५९, रा. करंजे पेठ, सातारा याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून ५४ हजार ८६० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.

esahas.com

जिल्ह्यातील 28 कोरोना केअर सेंटर कुलूपबंद

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग घटल्याने जिल्ह्यातील 28 कोरोना केअर सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी जंबो हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य हलविण्या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

esahas.com

पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंदराव देसाई

सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.