पांढरवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत पोल्ट्रीच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ४ चारचाकी वाहने, ७ दुचाकी, ११ मोबाइल्स, तलवारी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९८ हजार ६९० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत २० जणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
सातारा : पांढरवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत पोल्ट्रीच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ४ चारचाकी वाहने, ७ दुचाकी, ११ मोबाइल्स, तलवारी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९८ हजार ६९० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत २० जणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ मार्च रोजी ४ वाजून १० मिनिटाच्या सुमारास पांढरवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत प्रदीप रामचंद्र नलावडे रा. डिस्कळ यांच्या मालकीच्या शेतातील पोल्ट्रीच्या उघड्या शेडमध्ये स्वतः प्रदीप रामचंद्र नलावडे, सागर दशरथ काटकर, रा. ललगुण, ता. खटाव, दयानंद गजानन गोसावी रा. चिंचणी, ता. खटाव, गणेश विठ्ठल कांबळे रा. वडगाव निंबळक, केशव तात्याराम वाघ, सुरज शिंदे रा. बारामती, सचिन कांबळे (पूर्ण पत्ता समजू शकला नाही), तानाजी नानासो कुकाले रा. दरेवाडी, ता. फलटण, मंगेश देवराज यशवदे, रा. बारामती, सुरज भीमा निंबाळकर रा. डोरलेवाडी, ता. बारामती, मयूर आनंदराव कदम रा. डिस्कळ, ता. खटाव, अमोल अशोक कांबळे, रा. निंभोरे, ता. फलटण, अंकुश महादेव बनसोडे रा. ताथवडा, ता. फलटण, मारूती दशरथ जाधव, अंकुश भगवान अहिवळे दोन्ही रा. चिंचणी, ता. खटाव, दिगंबर नारायण पवार, रा. डिस्कळ, ता. खटाव, महादेव संपत शिंदे यांच्यासह एकूण २० जण बेकायदेशीर, बिगर परवाना तीन पानी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ४ चारचाकी वाहने, ७ दुचाकी, ११ मोबाइल्स, तलवारी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९८ हजार ६९० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार चंद्रहार खाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


