maharashtra

१ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप

1 crore 40 lakh to the plaintiff
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला १ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला असून चांगली कामगिरी केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज कौतुकाची थाप टाकली.

सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला १ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला असून चांगली कामगिरी केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज कौतुकाची थाप टाकली.
सातारा शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजय बन्सल म्‍हणाले, दि. २० ऑक्टोंबर  २०२१ रोजी सातारा येथील सदरबझार परिसरात वनराज शिवाजी कुमकर, रा. शनिवार पेठ, सातारा यांची गाडी थांबून त्यांच्या मानेला चाकू लावून त्यांच्याकडील मोबाइल दोन पेनड्राईव्ह चोरून नेले होते. महानंदा प्रदीप तांबोळी रा. गुरुवार पेठ, सातारा आणि सीमा संजय कोकरे, रा. केसरकर पेठ, सातारा शाडो मी मैत्रीण असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. सीमा कोकरे या महिलेने तांबोळी यांच्या घरातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. दिलीप विठ्ठल भिसे, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा यांच्याकडून संजय श्रावण सूर्यवंशी रा. चिमणपुरा पेठ, सातारा यांनी वेळोवेळी सेंट्रींग च्या कामासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटा भाड्याने घेऊन त्या परस्पर विकून १ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला होता. आकाश राजेंद्र यादव, राहणार गोडोली, ता. सातारा यांच्या संभाजीनगर सातारा येथील असणाऱ्या ढाणे क्लासेस शेजारील फ्रेंड्स बेकरीचे कुलूप तोडून आतील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले होते. शिर्के व सय्यद यांनी फिर्यादीचे ट्रक नोटरी करून पुढील हप्ते भरतो असे सांगून ते घेऊन गेले होते मात्र नंतर त्यांची परस्पर विक्री करून १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली होती. हे गुन्हे सुद्धा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. तानाजी दत्तात्रय सासणे, रा. साई वरद रेसिडेन्सी, संगमनगर, सातारा यांनी पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेली होती. असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला १ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी अजय बन्सल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या अधिकाऱ्यांवर कौतुकाची थाप टाकत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस हवालदार नंदा अनभुले, पोलीस शिपाई विकास शिंदे यांचे विशेष कौतुक केले.