घराशेजारी उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोमध्ये एका ७५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. मधुकर बाबुराव पवार रा. शारदादीप ऑटोमोबाइलजवळ, वाढेफाटा, खेड, सातारा असे या मृत वृद्धाचे नाव आहे.
सातारा : घराशेजारी उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोमध्ये एका ७५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. मधुकर बाबुराव पवार रा. शारदादीप ऑटोमोबाइलजवळ, वाढेफाटा, खेड, सातारा असे या मृत वृद्धाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे एक टेम्पो उभा होता. या टेम्पोमध्ये एक वृद्ध लटकत असल्याची माहिती सकाळी सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह टेम्पोमधून बाहेर काढला. त्यावेळी हा मृतदेह मधुकर पवार यांचा असल्याचे पुढे आले.
पवार हे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता घरातून निघून गेले होते. सकाळी नातेवाइकांनी शोधाशोध केल्यानंतर घराच्या शेजारी उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मानसिक ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.