maharashtra

Aadhaar: आधारवरील नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकता?


Aadhaar: How often can you change the name and address of Aadhaar?
Aadhaar Card : सध्या आधार हा अत्यंत महत्वाचा दस्तवेज झाला आहे.

सध्या शाळा,महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने प्रत्येक आधार केंद्रांवर माहिती अपडेट करण्यासाठी गर्दी होत आहे. आता आधार क्रमांकासोबत मोबाईल नंबर,पॅनकार्ड जोडणे गरजेचे झाले आहे. नाहीतर नागरिकांना वेळेवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधारवरील माहिती अपडेट करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) नियम जारी केले आहेत. (How often can you change the name and address of Aadhaar?)

कितीवेळा बदल करू शकता?

जन्मतारीख : जन्मतारखेच्या तारखेत कधीच बदल करता येत नाही. केवळ ‘डाटा एन्ट्री’ करताना काही चूक झाल्यास फक्त एकदा आणि एकदाच अपडेट करता येते.

नाव : आधारवरील नावात दोनवेळा बदल करता येऊ शकते.

पत्ता : फक्त एकदाच बदल करणे शक्य आहे.

लिंग : यासंदर्भातील माहिती केवळ एकदाच अपडेट करता येईल.
या कामासाठी आधार हवेच-

नवीन मोबाईल सीम कार्ड

नवीन बॅंक खाते उघडणे

शाळेतील प्रवेश

शिष्यवृत्ती

शालेय शुल्कमाफी सवलतींसाठी

रेशन कार्ड काढणे

बॅंक कर्ज

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी
दुरूस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, विमा पॉलिसी

बॅंक स्टेटमेंट, पासबूक

पोस्ट ऑफिस स्टेटमेंट, पासबूक

रेशन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना,

विद्यूत बील, पाणी बील,टेलिफोन लॅन्डलाईन बील (तीन महिन्यांपेक्षा जास्त जुने नको)

मालमत्ता कर पावती( एका वर्षापेक्षा जास्त जुनी नको)