सातारा येथे सुमारे ५५ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई
येथील बुधवार नाका ते बाबर कॉलनी करंजे परिसरामध्ये दुचाकीवरून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करणाऱ्या तानाजी कृष्णा किर्दत, वय ५९, रा. करंजे पेठ, सातारा याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून ५४ हजार ८६० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
सातारा : येथील बुधवार नाका ते बाबर कॉलनी करंजे परिसरामध्ये दुचाकीवरून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करणाऱ्या तानाजी कृष्णा किर्दत, वय ५९, रा. करंजे पेठ, सातारा याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून ५४ हजार ८६० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ मार्च रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना एक इसम बुधवार नाका ते बाबर कॉलनी करंजे मार्गावरून दुचाकीवरून बेकायदेशीर दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा लावला असता मिळालेल्या माहितीनुसार १२.४५ वाजण्याच्या सुमारास एक इसम बुधवार नाका बाजूकडून त्याच्या ताब्यातील एक्टिवा दुचाकीवरून खाकी रंगाच्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन येताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यास थांबवण्याचा इशारा केला मात्र तो न थांबता तसेच पुढे निघून जाऊ लागल्यामुळे पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव तानाजी कृष्ण किर्दत असल्याचे सांगितले. दुचाकीवरील पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये १४ हजार ८६० रुपये किमतीची विदेशी दारू आणि दुचाकी असा एकूण ५४ हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सचिन पवार यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर किर्दत यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी सहभाग घेतला.


