सातारा शहरातून दोन महिलांच्या गळ्यातून अज्ञाताने सुमारे दीड लाखांहून अधिक किंमतीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. ही घटना दि. २२ मार्च रोजी तालीम संघ रस्ता, पारंगे चौक सदरबझार या दोन्ही ठिकाणी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघा अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहरात वाहतूकीचा नेहमीच अनेकदा फज्जा उडालेला पहावयास मिळत होता. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटची संकल्पना आली अन ती पूर्ण झाली. आता याच ग्रेड सेपरेटरमध्ये या मार्गाची दिशा न समजल्याने परप्रांतीय या मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
संगमनगर (खेड), ता. सातारा येथील एका पेट्रोल पंपाच्या समोरून गुटख्यासह छोटा हत्ती वाहन असा एकूण २ लाख ११ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज पांडुरंग पोळ, वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा आणि गणेश मोरे, रा. पाचवड, ता. वाई या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सातारा येथील युवतीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील युनूस बालेखान पठाण आणि त्याचा सहकारी नौशाद पठाण यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हाॅटेलमध्ये युवक- युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळला. कोणतीही परवानगी न घेता ग्रीनलॅन्ड या हॉटेलमध्ये कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमापूर्वीच जमलेल्या युवक, युवतींना पोलिसांनी हकलले, मात्र आयोजक किंवा हाॅटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले.
श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, अशा घोषणा देत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआयच्या आठवले गटाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे.
खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे, ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या होण्याचा मान मिळवला आहे.
संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत देशप्रेमाची प्रचिती देत पर्यावरणपूरक आदर्शवत रंगपंचमी साजरी करण्यात आली. ‘संजीवनी’च्या या उपक्रमाचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे परिसरातून बोलले जात आहे.