maharashtra

संगमनगर येथून २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

गुटख्यासह छोटा हत्ती वाहनाचा समावेश

2 lakh 11 thousand rupees seized from Sangamnagar
संगमनगर (खेड), ता. सातारा येथील एका पेट्रोल पंपाच्या समोरून गुटख्यासह छोटा हत्ती वाहन असा एकूण २ लाख ११ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज पांडुरंग पोळ, वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा आणि गणेश मोरे, रा. पाचवड, ता. वाई या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सातारा : संगमनगर (खेड), ता. सातारा येथील एका पेट्रोल पंपाच्या समोरून गुटख्यासह छोटा हत्ती वाहन असा एकूण २ लाख ११ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज पांडुरंग पोळ, वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा आणि गणेश मोरे, रा. पाचवड, ता. वाई या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव- सातारा मार्गावर संगमनगर येथील पारेख पेट्रोल पंपासमोर दि. २३ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास युवराज पोळ आणि गणेश मोरे यांच्या ताब्यात असणाऱ्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम. एच. ११ एजी ९५२० मध्ये तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित असतानासुद्धा ११ हजार ५०२ रुपये किमतीचा गुटखा (विमल पान मसाला) आढळून आला. त्यांच्याकडून गुटख्यासह छोटा हत्ती वाहन असा एकूण २ लाख ११ हजार ५०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या विरोधात पोलीस नाईक धनंजय खंडेराव दळवी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरील दोघांनाही अटक करण्यात आली आहे.