चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआयच्या आठवले गटाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे.
सातारा : चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआयच्या आठवले गटाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे.
तीन दिवसापूर्वी सातारा येथील पंचायत समिती परिसरातून एका चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून खिंडवाडी- सोनगाव मार्गावर एका महाविद्यालयाच्या नजिक तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असताना आज आरपीआयच्या आठवले गटाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन या घटनेला तीन दिवस होऊनही अद्याप या घटनेतील गुन्हेगार मोकाट असल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करून पोलिसांच्या दिरंगाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेतील गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन करून त्याला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. संबंधिताला तत्काळ अटक न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, अक्षय कांबळे, वैभव गायकवाड, राजू कांबळे, राजू सय्यद आदी उपस्थित होते.


