maharashtra

‘संजीवनी’च्या तिरंगी रंगपंचमी ने दिली देशप्रेमाची प्रचिती


The triangular Rangpanchami of 'Sanjeevani' gave proof of patriotism
संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत देशप्रेमाची प्रचिती देत पर्यावरणपूरक आदर्शवत रंगपंचमी साजरी करण्यात आली. ‘संजीवनी’च्या या उपक्रमाचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे परिसरातून बोलले जात आहे.

सातारा : संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत देशप्रेमाची प्रचिती देत पर्यावरणपूरक आदर्शवत रंगपंचमी साजरी करण्यात आली. ‘संजीवनी’च्या या उपक्रमाचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे परिसरातून बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत रंगपंचमीचे औचित्य साधून आणि जागतिक जल दिनाचे भान राखून पाणी विरहित कोरड्या तिरंगी रंगाने शहिदांना श्रद्धांजली देऊन अभिनव देशप्रेमी रंगपंचमी साजरी करण्यात आली. प्रारंभी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व भारत देशासाठी बलिदान देणार्‍या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून केशरी, पांढरा, हिरवा या तिरंगी कोरड्या पर्यावरणपूरक रंगांची उधळण करून महिलावर्गाने देशप्रेमाची भावना जागृत केली. तसेच जागतिक जल दिनानिमित्ताने पाणी बचत करून जलदिन साजरा केला. या प्रसंगी संजीवनी लेडीज फिटनेस सेंटरच्या संचालिका वर्षा राजेश भोसले, शितल सासवडे, प्राजक्ता पवार, सोना घाडगे, कविता भोसले, शिल्पा कुलकर्णी, मेधा चव्हाण व महिला उपस्थित होत्या.