सातारा येथील युवतीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील युनूस बालेखान पठाण आणि त्याचा सहकारी नौशाद पठाण यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथील युवतीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील युनूस बालेखान पठाण आणि त्याचा सहकारी नौशाद पठाण यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा येथील एक २६ वर्षीय सुशिक्षित युवती शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात कार्यरत आहे. या व्यवसायानिमित्त तिची युनूस पठाण, नौशाद पठाण यांच्याशी ओळख झाली. या व्यवसायात प्रथम युनूस पठाण याला चांगला लाभ झाला. मात्र नंतर शेअर गडगडल्याने त्याने त्या युवतीकडे तीन लाख रुपयांची मागणी करून जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत माझ्याशी व नौशाद पठाण याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी केली. ही घटना पोवई नाका येथील एका बँकेसमोर घडली असून याबाबत पीडित युवतीने दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


