Satara

esahas.com

किरकोळ वादातून मल्हार पेठेतील तरुणावर कोयत्याने गंभीर वार

साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर करंजातील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने  हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केला आहे. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

esahas.com

कोडोली गावच्या हद्दीत एकाला मारहाण

कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत एकाला  तीन जणांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

राज्यातील महसूल विभागात कारकून पदे तत्काळ भरावीत तसेच नायब तहसीलदारांच्या बाबतीत नवीन काढलेला आदेश शासनाने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

esahas.com

सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल : नाना पटोले

डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

esahas.com

कैरीचं पन्हं बनवायचंय... पाहा ही सर्वात सोपी रेसिपी

मार्केटमध्ये कैरीचं पन्हं सहजतेने उपलब्ध असतं, पण तुम्ही हे पन्ह घरच्या घरी देखील बनवू शकता. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. अशा दिवसांत आपल्या सर्वांचा कल थंड पेय पिण्याकडे असतो. मात्र थंड कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा कैरीचं पन्ह हा एक उत्तम पर्याय आहे. कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं.

esahas.com

हात थरथरण्याच्या समस्येवर फायदेशीर ठरतील या एक्सरसाइज

लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हात थरथरण्याचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यतः वृद्धापकाळात ही समस्या अधिक बळावू शकते. अनेक कारणांमुळे ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. पार्किन्सन्स आजारातही हात थरथण्याची होण्याची समस्या उद्भवू शकते. लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

esahas.com

सातारा बसस्थानक परिसरात एकाला सहा जणांकडून मारहाण

बहिणीचे फोटो का काढतोस? असा जाब विचारत एकाला सातारा बसस्थानक परिसरात सहाजणांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

मालगाव येथे एकाला मारहाण

मालगाव, ता. सातारा येथे एकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा- कोरेगाव मार्गावर अपघातात दोघे जखमी

सातारा- कोरेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

ट्रक-दुचाकी अपघातात इंदापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी ठार, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात ठार झाले. श्रीकांत रवींद्र शिंदे असे मृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.