maharashtra

किरकोळ वादातून मल्हार पेठेतील तरुणावर कोयत्याने गंभीर वार


Serious attack on a youth from Malhar Peth with a scythe due to a minor dispute
साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर करंजातील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने  हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केला आहे. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सातारा : साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर करंजातील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने  हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केला आहे. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
सदरच्या हल्ल्यामध्ये रोहित सोनटक्के हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वार करणारा तरुण अद्यापही फरार असून शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.