डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
सातारा : डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कोल्हापूरवरून मुंबईला जाताना रविवारी सातारा येथील प्रिती हॉटेल येथे थांबले होते. त्यांच्यासोबत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे होते. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी स्वागत केले.
यावेळी पटोले म्हणाले, डिजिटल सभासद नोंदणी मुळे काँग्रेस पक्ष तळागाळातील कार्यकत्यांपर्यंत गेल्यामुळे पुन्हा एकदा प्रत्येक गावातील, गल्लीतील, नागरिक सभासद झाल्यामुळे कॉंग्रेस मजबुत होण्यासाठी मदत होईल. सातारा जिल्ह्यात डिजिटल सभासद नोंदनी मोठ्या प्रमाणावर करावी. यापुढे सातारा जिल्ह्यात व तालुक्यात प्रत्येक महिन्यात एक वेळ काँग्रेसचे मंत्री येऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ जाधव म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संपर्क मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीचे काम सुरू असून डिजिटल सभासद नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेण्यात आल्या आहेत,
जिल्हा नियोजन समिती सद्स्य विजयराव कणसे व विराज शिंदे यांनी किसनवीर साखर कारखाना बंद असल्यामुळे वाई व कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस तसाच तोडून आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ऊसाची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडवणूक केली जात आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली असता याबाबत पटोले यांनी ही बाब योग्य नसून मी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर लवकरच बोलणार आहे.
यावेळी उदय पाटील,नरेश देसाई, विराज शिंदे, मनोजकुमार तपासे, रजनी पवार, धनश्री महाडिक, रजिया शेख, मनीषा पाटील,अमोल शिंदे अभय कारंडे, अरबाज शेख, सभाजी उत्तेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


