maharashtra

मालगाव येथे एकाला मारहाण


One beaten at Malgaon
मालगाव, ता. सातारा येथे एकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : मालगाव, ता. सातारा येथे एकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ एप्रिल रोजी सहा वाजण्याच्या सुमारास मालगाव येथे राहत्या घरासमोर रवींद्र दामू उघडे यांनी ठेवायला दिलेले दहा हजार रुपये मागितले असता त्याचा राग मनात धरून त्यांचा सख्खा भाऊ सुधीर धर्मु उघडे याने त्यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली.