बहिणीचे फोटो का काढतोस? असा जाब विचारत एकाला सातारा बसस्थानक परिसरात सहाजणांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : बहिणीचे फोटो का काढतोस? असा जाब विचारत एकाला सातारा बसस्थानक परिसरात सहाजणांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ एप्रिल रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्थानक परिसरात असणाऱ्या सेवन स्टार सलून परिसरात श्रेया गोसावी मंगेश देवकर सुरेश सुतार, मंगेश देवकर, सुरेश सुतार व त्यांच्यासमवेत असलेल्या तीन अनोळखी युवकांनी माझ्या बहिणीचे फोटो काढतोस असा जाब विचारत शिवाजी सोपान राऊत, राहणार सातारा याला मारहाण करून दुकानातील काउंटरची काच फोडून नुकसान केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


