maharashtra

सातारा- कोरेगाव मार्गावर अपघातात दोघे जखमी


Two injured in Satara-Koregaon road accident
सातारा- कोरेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : सातारा- कोरेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप श्रीकांत साळुंखे, वय ४४, रा. तडवळे, ता. कोरेगाव हे दुचाकीवरून सातारा येथून कोरेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते आणि दुसरा दुचाकीस्वार विनायक रमेश गुरव, रा. नागाचे कुमठे, ता. खटाव हे दोघे जखमी झाले त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.