maharashtra

कोडोली गावच्या हद्दीत एकाला मारहाण


One was beaten on the outskirts of Kodoli village
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत एकाला  तीन जणांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत एकाला  तीन जणांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० एप्रिल रोजी सहा वाजण्याच्या सुमारास देगाव फाटा कोडोली, ता. सातारा गावच्या  हद्दीत सातारा रहिमतपूर मार्गावर नदी तेथीलच नजीर शब्बीर मुलाणी याने अविनाश अशोक गायकवाड यांच्या कारला दुचाकीने धडक दिली. त्यांच्यामध्ये नुकसानीबाबत चर्चा सुरू असताना  त्या ठिकाणी कुणाल मदने आणि शाहरुख मुलाणी हे दोघे आले. त्यांनी त्याला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.