Satara

esahas.com

पेट्रोलचे दर उतरल्याने पंपावर गर्दी पण, पेट्रोल गायब...

पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालक खुश असले तरी खटाव तालुक्यातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने सध्या पेट्रोल नसल्याचे फलक काही ठिकाणी लागले आहेत. तर वडूज येथील पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

esahas.com

हेवेदावे बाजूला ठेवून कामाचे परिणाम दाखवा

शिवसैनिकांनी आपापसात कोणतेही हेवेदावे न ठेवता चांगल्या कामांना परिणाम द्यावेत काम करूया आणि कामाचे रिझल्ट येऊ द्या, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

esahas.com

शहीद विजय शिंदे यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे लेह लडाख येथे देशसेवा बजावत होते. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरगतीमुळे गेली दोन दिवस विसापूरसह संपूर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.

esahas.com

राष्ट्रवादीच्या राजकीय षडयंत्राला आता जशास तसे उत्तर देणार

माझ्यावर जे राजकीय आकसातून गुन्हे दाखल झाले त्याच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख हे निमित्त आहे. पण आमदार गोरे कोणाला घाबरणारा आमदार नाही. राष्ट्रवादी च्या राजकीय षडयंत्राला जशास तसे प्रत्युत्तर देणार, असा दमदार घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला

esahas.com

रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

वडीलोपार्जीत शेतातील जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडविली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चिखली ता. सातारा येथील दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा

‘पुन्हा कॉलेजला आलीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्यामुळे संबंधित तरूणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

esahas.com

अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांची धाड

सोनगाव संमत निंब ता.सातारा येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

esahas.com

खत विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई

रीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आणि एका खत विक्रेत्याचा कायमस्वरुपी परवाना रद्द करण्यात आला आहे

esahas.com

कृषि तंत्राची अंमलबजावणी ही काळाची गरज : जितकर

खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिजउगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज  प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.

esahas.com

गोडोली चौकाने अखेर घेतला मोकळा श्वास

सातारा शहराच्या पूर्वेला असणाऱ्या गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय व गोडोली जकात नाका परिसर दरम्यानच्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागाने या कारवाईमध्ये पाच टपर्‍या आणि तीन हातगाड्या उचलून येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.