maharashtra

पेट्रोलचे दर उतरल्याने पंपावर गर्दी पण, पेट्रोल गायब...


Crowds at pumps due to falling petrol prices, but petrol disappears ...
पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालक खुश असले तरी खटाव तालुक्यातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने सध्या पेट्रोल नसल्याचे फलक काही ठिकाणी लागले आहेत. तर वडूज येथील पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

- अजित जगताप
सातारा : पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालक खुश असले तरी खटाव तालुक्यातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने सध्या पेट्रोल नसल्याचे फलक काही ठिकाणी लागले आहेत. तर वडूज येथील पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

एखाद्या वस्तूचे दर वाढले की, त्याचा मुबलक साठा विक्रते यांच्याकडे उपलब्ध होतो. जुन्या वस्तू आणि नवीन दर अशी योजना राबविण्यात येते. पण, जेव्हा दर उतरतात तेव्हा मात्र, सदरची वस्तू संपल्याचे फलक लावले जातात किंवा त्या वस्तूंचा पुरवठा होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
वडूज, कातर खटाव व इतर ठिकाणी असलेले काही पेट्रोल पंप धारक ग्राहकांना पेट्रोल पुरविण्याची सेवा उपलब्ध करीत आहेत. परंतु, काहींनी पेट्रोल पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गरजवंत वाहनचालकांना मोटार सायकल मधील पेट्रोल संपल्यावर वाहनांच्या सोबत पायपीट करावी लागत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी याकडे लक्ष दिलेले नाही. कारण, सत्ताधारी असो की विरोधक. दोघांचेही सातारा जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत, त्यामुळे बहुदा या गोष्टीकडे कोणाचे लक्ष नाही, अशी काहींनी प्रतिक्रिया दिली आहे.