दहिवडी-फलटण रस्त्यावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत एकवीस हजाराची रोकड लंपास केली.
वाढती महागाई पहाता सध्या शासनाकडून मागासवर्गीय लोकांसाठी मिळत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठीचे अनुदान अत्यंत तुटपुंजे असून हे अनुदान पंतप्रधान अवास योजनेएवढे (२ लाख ५० हजार) करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनद्वारें केली आहे.
पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अंबादास कदम यांनी 22 वर्ष स्त्री रोग तज्ञ म्हणून अहोरात्र सेवा दिली. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली.
एम.आय.टी विश्व शांती विद्यापीठाच्या शाश्वतता अभ्यास विभागाच्या माध्यमातून यंदाचा जागतिक पर्यावरण दिन कोथरुड (पुणे) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वसुंधरेची चिंता असलेले तसेच निसर्गाची काळजी घेणारे पर्यावरण आणि जलप्रेमी प्रकाश जाधव यांना गौरवण्यात आले. तसेच बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे यांना सन्मानित करण्यात आले.
लग्न असो वा ऑफिस साडी एक असे आऊटफिट आहे अथवा अशी फॅशन आहे जी कुठेही आणि कधीही कॅरी करता येऊ शकते. लग्नसराईसाठी साड्यांचे अनेक प्रकार असतात, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही समारंभात अथवा ऑफिसमध्ये तुम्हाला साडी नेसायची असेल तर कॉटनची साडी हा उत्तम पर्याय आहे. अत्यंत हलकी आणि तितकीच प्रभावी अशी कॉटनची साडी, ज्यांनी बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही भुरळ घातली आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जाड भरजरी आणि खूप बोजड साड्या नेसण्यापेक्षा कॉटनच्या साड्यांचा (Cotton Saree) लुकही छान दिसतो आणि ही सांभाळायला पण सोपी जाते. ज्यांना साडी कशी नेसावी हे पण माहीत नसेल अशा व्यक्तींनाही कॉटनची साडी व्यवस्थित कॅरी करता येते. तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी साडी नेसायची असेल तर कॉटनच्या साडीबाबत काही स्टायलिंग टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे तुम्हाला अत्यंत क्लासी लुक (Classy Look) देण्यास मदत करतील.
बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा अॅसिडिटी (Acidity) किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. छातीत आणि पोटात जळजळ अशा समस्या दररोज त्रास देतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. मात्र, डॉक्टरांना न सांगता अशी औषधे घेतल्याने आरोग्याला हानी पोहोचते.तसेच, रसायनयुक्त औषधे देखील बहुतेक प्रकरणांमध्ये काही दुष्परिणाम दाखवतात.
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कवठे, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याने पसरणी, ता. वाई येथील एका व वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ५ हजार ४६४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.