maharashtra

गावठी पिस्तूल बाळगल्याने पसरणी येथील एकावर गुन्हा


Crime against one in Pasarni for carrying a pistol
बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल  बाळगल्याने पसरणी, ता. वाई येथील एका व वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाई : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल  बाळगल्याने पसरणी, ता. वाई येथील एका व वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जून रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास पसरणी येथील खाटीक आळी येथे तेथीलच मनोज हणमंत फरांदे याने ५५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीरपणे स्वतःजवळ बाळगण्याची तक्रार पोलिस कर्मचारी किरण निंबाळकर यांनी वाई पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.