maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा


Crime in one of the cases that led to death
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जून रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास गजवडी, ता. सातारा गावच्या हद्दीत शुभम राऊत रा. कारी, ता. सातारा याने आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम.एच.११ ओवाय ८२४२ भरधाव वेगाने चालवून लिलाबाई अण्णा कदम, वय ६८, रा. गजवडी यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार अमर मधुकर कदम यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.