सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ५ हजार ४६४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ५ हजार ४६४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिस्कळ, ता. खटाव गावच्या हद्दीत सावता माळी मंदिराच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली तेथीलच शिवाजी खशाबा मदने हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून १ हजार २ ०२ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले दुसऱ्या घटनेत सातारा येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या राजधानी टॉवर जवळ शरद शामराव साळुंखे, रा. साई कॉलनी, शाहूपुरी, ता. सातारा हा जुगार खेळताना आढळून आला त्याच्याकडून पोलिसांनी ४ हजार २५२ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


