maharashtra

कवठे येथून १ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी


Gold worth Rs 1 lakh 72 thousand stolen from Kavathe
कवठे, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कवठे, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ मे ते १ जून या कालावधीत कवठे येथील मराठी शाळेजवळ असलेल्या तेथीलच रामचंद्र दादू कुडाळकर यांच्या घराच्या दरवाजातून आत हात घालून कडी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली मोहनमाळ आणि दीड तोळे सोन्याचे गंठण असे एकूण १ लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी‌ केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.