एम.आय.टी विश्व शांती विद्यापीठाच्या शाश्वतता अभ्यास विभागाच्या माध्यमातून यंदाचा जागतिक पर्यावरण दिन कोथरुड (पुणे) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वसुंधरेची चिंता असलेले तसेच निसर्गाची काळजी घेणारे पर्यावरण आणि जलप्रेमी प्रकाश जाधव यांना गौरवण्यात आले. तसेच बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे यांना सन्मानित करण्यात आले.
पुसेगाव : एम.आय.टी विश्व शांती विद्यापीठाच्या शाश्वतता अभ्यास विभागाच्या माध्यमातून यंदाचा जागतिक पर्यावरण दिन कोथरुड (पुणे) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वसुंधरेची चिंता असलेले तसेच निसर्गाची काळजी घेणारे पर्यावरण आणि जलप्रेमी प्रकाश जाधव यांना गौरवण्यात आले. तसेच बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे यांना सन्मानित करण्यात आले.
पर्यावरणवादी घटकांना सन्मानित करण्याच्या भावनेने अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यात एम.आय.टी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक विश्वनाथ कराड, जागतिक पर्यावरण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. राजेंद्र शेंडे, कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणारे पांडुरंग तावरे, बांबू डेव्हलपमेन्टचे डायरेक्टर संजीव कर्पे, एम.आय.टी पुणेचे व्हॉईस चांसलर मिलिंद पांडे यांचा समावेश होता.
पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी व पृथ्वीवर स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच लोकांना प्रेरीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माती आणि जल प्रदूषण रोखणे गरजेचे झाले आहे. माती ही पृथ्वीवरील एक महत्वाची नैसर्गिक संसाधन आहे जी थेट वनस्पती आणि अप्रत्यक्षपणे मानवजातीला आणि पृथ्वीवरील प्राण्यांना मदत करते. रासायनिक खते, कीटकनाशके, औद्योगिक कचरा इत्यादींच्या वापराने सोडल्या गेलेल्या विषारी घटकांमुळे माती प्रदूषित होत आहे. यामुळे जमिनीच्या सुपीकतेवरही वाईट परिणाम होत आहे. तसेच जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या निर्माण झाली असून आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे अवघड होऊन बसले आहे. परिणामी कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माती आणि जल वाचविण्यासठी शासनाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत जलप्रेमी प्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.


