बांबवडे, तालुका पाटण येथील गायमुख वाडी मार्गावर खडखडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना 10 जून रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. या प्रकरणी विजय शहाजी पवार वय 51 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सातारा येथे दुकानावर दगडफेक का केली, याचा जाब विचारण्याच्या रागातून तिघांनी दुकान चालकाच्या भावाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 10 जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली.
जळणाचे साहित्य उचलण्यास विरोध केला म्हणून चौघांनी रिक्षाचालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंजे पेठ येथे घडली आहे. ही घटना 11 जून रोजी सायंकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली आहे.
पोवई नाक्यावरील जिल्हा रुग्णालय मार्गावर सेंट पॉल शाळेच्या परिसरात 37 वर्षीय इसमाला एका अज्ञात युवकाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि त्याचे एअरटेल कंपनीचे सिम कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दिनांक 10 जून रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला आहे.
सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४१ हजार ७२८ रुपये रोख रक्कम, एक दुचाकी व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
येथील बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रामनगर, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री तेथीलच एक युवक शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित युवक कौशल बेबले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली.
एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला तेरा वर्षाचा विधिसंघर्षग्रस्त शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निरीक्षणगृहातून पळून गेला. या घटनेमुळे निरीक्षणगृहात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाचा निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या महिला पोलीस कर्मचार्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून इतर पाचजणांचा शोध सुरु आहे. संजय विनायक गायकवाड (वय 57, रा. पाचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.