गतवर्षीचे रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे व सचिव अभय पवार यांच्या प्रयत्नांतून 'सावित्री कन्या’ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत कराड शहर आणि परिसरातील १८ सावित्रीच्या लेकींना या सायकलींचे वाटप करण्यात आले.
रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सुमारे 17 कोटी 54 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोनजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
शिरवळ परिसरात सातारा उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना गाडी आडवी मारुन व जोरदार धडक देवून त्यांचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऍलर्ट असलेल्या त्यांच्या वाहन चालकाने हा प्रयत्न हाणून पाडला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून संबंधिताने केलेल्या भानगडी जिरवण्यासाठी त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्याचाच गेम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील श्रीमंत सहकारी बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी सव्वा चारशे अर्ज दाखल होण्याची वेळ आली. त्यामध्ये जातीच्या राजकारणाची लागण झाली असून या शिक्षकांना गुरू कोण? याचीच चर्चा रंगू लागली आहे.
म्हावशी, तालुका जावली येथील माजी सरपंच यांनी शासनाला त्यांच्या शेतजमिनी बाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप रघुनाथ भोसले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.