maharashtra

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोनजण बेपत्ता


जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोनजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोनजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नरसी कॉलनी तालुका कराड येथील राहत्या घरातून साक्षी संजय कांबळे ही युवती कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास कामेरी तालुका सातारा येथून अनिल अरुण भिल्ल वय 23 हा मनोरुग्ण युवक राहत्या घरातून तंबाखूची पुडी घेऊन माघारी येतो, असे सांगून निघून गेला आहे. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.