खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास क्षेत्र माऊली येथील रुबाब बेकरी समोर अक्षय संभाजी आढाव वैबावीस राहणार शेत्र माऊली तालुका सातारा हा दारू पिऊन आला व त्याने ओंकार यशवंत देशमुख वय 23 यास तू मला दारू पिण्यास पैसे देत नाहीस तुला जीवे मारून टाकीन असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कुर्हाड देशमुख यांच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख बाजूला झाल्याने कुर्हाडी चा वार चुकला. तेथून देशमुख पळत असताना आढाव याने देशमुख यांच्या मागे पळत येऊन देशमुख यांच्या डोक्यात पुढारीने मागील बाजूस वार केला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस नाईक भिसे अधिक तपास करीत आहेत.


