सुमारे 17 कोटी 54 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सुमारे 17 कोटी 54 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल 2022 पासून ते आज अखेर शिरवळ तालुका खंडाळा येथील सचिन महादेव माळी वय 32 यांना शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री करणे यासाठी अकाउंट काढून, शेअर्सचे कॉल देऊन, वेळोवेळी पैसे गुंतवण्यात सांगून अर्जुन सिंग आणि रितेश पांडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या दोघांनी माळी यांची 17 कोटी 54 लाख आठशे रुपयांची फसवणूक केलेली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार करीत आहेत.


