रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते 18 ऑक्टोबर रोजीच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान महबूब वासुद्दीन शेख वय 29, रा. आसू, पवारवाडी, ता. फलटण यांच्या उघड्या असलेल्या घराच्या रूम मधील 30 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे कानातील टॉप आणि 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम असलेली पेटी ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.


