जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठ ते संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मेघराज संजय जाधव वय 37, रा. शेंदुर्जने ता. वाई यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीटी 5887 ही सुरूर ब्रिजच्या पुलाखालून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दुसऱ्या घटनेत दत्त शिवम कॉलनी आगाशिवनगर कराड येथे राहत्या घरासमोर पार्क केलेली रावसाहेब रामचंद्र पवार वय 27 यांची दुचाकी क्रमांक एम एच 50 इ 8010 ही अज्ञात चोरट्याने 21 सप्टेंबर रोजी चोरून नेली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माची पेठ सातारा येथून अमित आदिनाथ माने वय 38 यांची राहत्या घरासमोर हँडल लॉक करून पार्क केलेली दुचाकी क्रमांक एम एच 11 एक्यू 1411 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
चौथ्या घटनेत फलटण शहर पोलीस हद्दीतील हिरा बियर बार, रविवार पेठ, फलटण येथून राजेंद्र बबन विटकर वय 44 राहणार फलटण तालुका फलटण यांची दुचाकी क्रमांक एम एच 11 एएक्स 2175 ही 22 ऑक्टोबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.


