अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता सुमारास रोहित दत्तात्रय कदम रा. मालगाव ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीएस 7740 रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून आंबवडे, ता. कोरेगाव च्या हद्दीत वाठार- सातारा जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत असलेल्या हणमंत वसंत वेदपाठक वय 49, रा. बनवडी, ता. कोरेगाव यांच्या मुलीस धडक देऊन जखमी केले. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार के. एच. गिरी अधिक तपास करीत आहेत.


