Satara

esahas.com

देहात कंपनीच्या माध्यमातून शेती व दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गेल्या सुमारे १० वर्षांपासून देशातील ११ राज्यात आणि ८ महिन्यांपासून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत कंपनीने आपले कार्य सुरु केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन देहात पशू खाद्य विभाग व्यवस्थापक संदीप शेळके यांनी केले.

esahas.com

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन मंगरूळे

माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.लोकमतचे प्रतिनीधी सचिन मंगरूळे यांची, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून दै.सकाळचे प्रतिनीधी विशाल गुंजवटे, उपाध्यक्षपदी दै. सत्यसह्याद्रीचे प्रतिनिधी नवनाथ भिसे, सचिवपदी माण चौफेरचे संपादक बापूसाहेब मिसाळ, खजिनदारपदी दै.पुण्यनगरीचे प्रतिनीधी अभिजित अवघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

esahas.com

इनोव्हेटिव्ह सातारा दिनदर्शिकेचे खा. उदयनराजे यांच्या हस्ते प्रकाशन

इनोव्हेटिव्ह सातारा या संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. माहितीपूर्ण संदेश साताऱ्यातील महत्त्वपूर्ण नंबर आणि एक शुभ विचार असा समावेश असणाऱ्या या दिनदर्शिकेचे उदयनराजे भोसले यांनी कौतुक केले.

esahas.com

गुरुवार परज येथे पालिकेचे नवीन शॉपिंग सेंटर

सातारा शहराच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अस्तित्वात असणाऱ्या गुरुवार परज येथील जुन्या शॉपिंगसेंटरच्या बाजूला सुसज्य आणि अदयावत शॉपिंग सेंटर उभारणेचा नगरपरिषदेचा प्रस्तावास शासनाने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन मंजूरी दिली आहे. त्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी देखिल प्राप्त झाला आहे.

esahas.com

खामगावला मारामारी; परस्परविरोधी गुन्हे

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कुर्‍हाड, काठी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पठाणवस्ती, खामगाव, ता. फलटण येथील पाचजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार

अज्ञात चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत रामचंद्र तुकाराम जगदाळे (वय 35, रा. पाचवड, ता. माण) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ओह.

esahas.com

बनावट आधारकार्डवरून लोन; तिघांविरोधात गुन्हा

बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे 30 हजार 999 रुपये किंमतीचा टीव्ही फायनान्सवर खरेदी करून हप्ता न भरता कंपनीस बनावट आधारकार्ड सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी साजन प्रमोद कांबळे (रा. पिंप्रद, ता. फलटण) मनोज सुभाष भोसले व जुबेर नजीर पठाण (दोघे रा. निरावाघज, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी

जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक; एकावर गुन्हा

स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.