maharashtra

खामगावला मारामारी; परस्परविरोधी गुन्हे


पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कुर्‍हाड, काठी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पठाणवस्ती, खामगाव, ता. फलटण येथील पाचजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कुर्‍हाड, काठी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पठाणवस्ती, खामगाव, ता. फलटण येथील पाचजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरय्या दस्तगीर पठाण (वय 45, रा. खामगाव) यांनी फिर्याद दिली. सलीम बाबू पठाण, इन्तज सलीम पठाण, सुजान अरबाज पठाण, शैनाज सलीम पठाण, उमेरा सलीम पठाण (सर्व रा. पठाणवस्ती, खामगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तपास हवालदार हांगे करत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणातील इन्तज सलीम पठाण यांनीही तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून सुरय्या दस्तगीर पठाण, अरबाज दस्तगीर पठाण, दस्तगीर बाबू पठाण यांच्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकळ्या जागेत सरपण का टाकले या कारणावरून सुरीच्या सहाय्याने हल्ला केला, मुलींना शिवीगाळ केली, शेळ्या सोडून देऊन त्यांना मारहाण केली तसेच अंगावर मारुती ओम्नी गाडी घातल्याचे म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.