बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे 30 हजार 999 रुपये किंमतीचा टीव्ही फायनान्सवर खरेदी करून हप्ता न भरता कंपनीस बनावट आधारकार्ड सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी साजन प्रमोद कांबळे (रा. पिंप्रद, ता. फलटण) मनोज सुभाष भोसले व जुबेर नजीर पठाण (दोघे रा. निरावाघज, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे 30 हजार 999 रुपये किंमतीचा टीव्ही फायनान्सवर खरेदी करून हप्ता न भरता कंपनीस बनावट आधारकार्ड सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी साजन प्रमोद कांबळे (रा. पिंप्रद, ता. फलटण) मनोज सुभाष भोसले व जुबेर नजीर पठाण (दोघे रा. निरावाघज, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या तिघांनी फलटण येथील प्रिन्स कॉम्प्युटर अॅन्ड कॅफे या दुकानातून दि. 10 ऑक्टोबरच्या दरम्यान खरेदी केली होती. प्रशांत राजेंद्र शिंदे (वय 29, मूळ रा. भवानी पेठ, सोलापूर, हल्ली रा. अकलूज, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.


