maharashtra

स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक; एकावर गुन्हा


स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑगस्ट 2021 ते 28 डिसेंबर 2022 पर्यंत राजू प्रताप भिल रा. खापरखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार याने स्वराज इंडिया ऍग्रो लिमिटेड, उपळवे, ता. फलटण यांना ऊस तोडणी कामगार देतो, म्हणून वेळोवेळी 4 लाख 40 हजार रुपये घेऊन कोणीही ऊस तोडणी कामगार न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.