maharashtra

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार


अज्ञात चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत रामचंद्र तुकाराम जगदाळे (वय 35, रा. पाचवड, ता. माण) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ओह.

सातारा : अज्ञात चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत रामचंद्र तुकाराम जगदाळे (वय 35, रा. पाचवड, ता. माण) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ओह.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारी तीनच्या सुमारास फलटण-दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी गावच्या हद्दीत हा अपघात घडला. जगदाळे हे फलटणवरून पाचवडकडे निघाले असताना भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने जगदाळेंच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. या अपघातातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पसार झाला. तपास उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.