जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान सचिन चंद्रकांत शिंदे रा. शाहूपुरी, सातारा यांची दुचाकी क्रमांक एम एच 11 बीसी 1514 जिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.


