महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 डिसेंबर रोजी मीरा बाळू कांबळे रा. कोंडवे, ता. सातारा या गोवऱ्या आणण्यासाठी रस्त्याने पायी जात असताना चव्हाण (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरथाव वेगात, बेदरकारपणे चालवून कांबळे यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.


